मुंबईकरांनो स्वत:ची काळजी घ्या; स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, डेंग्यू, लॅप्टोची साथ

मुंबईकरांनो स्वत:ची काळजी घ्या; स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, डेंग्यू, लॅप्टोची साथ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पावसाचा वाढता जोर मुंबईत अनेक साथीचे आजार घेऊन येत आहे. दिवसागणिक मुंबई शहर-उपनगरांत साथीच्या आजारांचा आलेख चढताच असल्याचे चित्र पाहायला

मिळत आहे. 

 

त्यामुळे वेळोवेळी प्रशासनातर्फे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

स्वाइन फ्लूसह गॅस्ट्रो, डेंग्यू आणि लॅप्टोचा विळखा वाढल्याने आरोग्याच्या तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 

यंदा स्वाइन फ्लूमुळे जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबईत 22 जणांचा बळी गेला असून, 672 स्वाइन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली. 

 

गेल्या महिन्याभरात मुंबईत स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे नवे संकट मुंबईकरांसमोर उभे राहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version