Viral Video: मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर, पोलिसानंच तरुणीची छेड काढल्याचा आरोप

मुंबईच्या ताडदेव परिसरात एका तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप पोलिस कर्मचाऱ्यावर झाला आहे.
Viral Video: मुंबई पोलिसांची अब्रू वेशीवर, पोलिसानंच तरुणीची छेड काढल्याचा आरोप

मुंबई: मुंबई पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारी घटना ताडदेव परिसरात समोर आली आहे. एका महिला तरुणीची छेडछाड केल्याचा आरोप थेट मुंबई पोलिसातील सहाय्यक उपनिरीक्षकावर (ASI) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर ही घटना उघडकीस आली असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचे वर्तन पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राणे असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुंबई पोलिसांच्या लोकल आर्म्स २ युनिटमध्ये कार्यरत होता. ताडदेव भागात एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी राणेला पकडून चांगलाच जाब विचारला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिकांनी त्याला मारहाण केल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. “कायदा रक्षकच जर कायदा मोडत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याची टीका होत आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. घटना मुंबई पोलिसांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version