मध्य रेल्वेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने अंबरनाथ रेल्वे स्थानकावर नवीन पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे शुक्रवार आणि शनिवार अशा दोन रात्री विशेष मेगब्लॉक करण्यात येणार आहे.
समोर आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, मध्य रेल्वेचा हा ब्लॉक मध्यरात्री 1 वाजून ५० मिनिटांपासून ते 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन्ही रात्री दीड तास हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम रात्रीच्या वेळी मुंबईहून कर्जत-अंबरनाथ मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांवर होणार आहे.या काळात मुंबई आणि उपनगरादरम्यान धावणाऱ्या काही लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – Metro Ticket Rate : मुबईकरांच्या खिशाला कात्री ! मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना बसणार मोठा फटका
अंबरनाथहून रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकलही रद्द करण्यात येणार आहे. तर मध्यरात्री 12 वाजून 2 मिनिटांनी सीएसएमटीहून अंबरनाथकडे जाणारी लोकल तसेच मध्यरात्री 12 वाजून 12 मिनिटांनी सीएसएमटीहून कर्जतकडे रवाना होणारी लोकल रद्द होणार आहे.
या ब्लॉकमुळे दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या मुख्य मार्गाऐवजी पनवेल मार्गे वळवण्यात येणार आहेत.यामुळे काही एक्सप्रेस गाड्यांना पनवेल मार्गे प्रवास करावा लागणार असल्याने वेळेत थोडा बदल होईल. भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या कर्जत येथून पनवेल आणि दिवा मार्गे वळवून पुढे ठाण्याला आणि नंतर नियोजित स्थळी रवाना होतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.