रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईमध्ये एकीकडे मॅरेथॉनची धूम सुरु आहे तर दुसरीकडे मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची वाहतूक थोडी संथ गतीनं चालणार आहे. आज मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मुंबईकरांची गती थोडी थंड होणार आहे. रविवार म्हणजे सुट्टीचा आणि फिरण्याचा दिवस पण, अशातच मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

आजचा मेगाब्लॉक अशाप्रकारे असणार :

 

ठाणे ते कल्याणदरम्यान 11 ते 4 दरम्यान मेगाब्लॉक

डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार

हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

10.03 ते दु. 4.34 पर्यंत नेरूळ ते पनवेलमध्ये खंडीत राहणार

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवलीपर्यंत स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version