Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक आरामदायक! AC लोकलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, 2027 पर्यंत….

मुंबईची वाढती प्रवासी संख्या आणि उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण लक्षात घेता केंद्राच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
Mumbai Local News: मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक आरामदायक! AC लोकलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, 2027 पर्यंत….

मुंबईच्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत लवकरच मोठ्या संख्येने एसी लोकल गाड्या दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने मुंबईसाठी तब्बल 268 एसी लोकल ट्रेन्सना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आरामदायी होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. मुंबईची वाढती प्रवासी संख्या आणि उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण लक्षात घेता केंद्राच्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालं आहे.

2027 पर्यंत पहिली एसी लोकल दाखल होणार

या मंजुरीनंतर मुंबईच्या लोकल सेवेत एसी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.  2027 पर्यंत पहिली एसी लोकल मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य एसी लोकल गाड्या सेवेत आणल्या जाणार आहेत.सध्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत 238 नव्या एसी लोकल गाड्या दाखल झाल्यास उपनगरीय रेल्वे सेवेची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा- Mumbai Garden Accident: मुंबईतील शीवमध्ये मोठी दुर्घटना! उद्यानातील गझिबोचं छप्पर कोसळलं, पाच वृद्ध जखमी

दरम्यान, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत उपनगरीय रेल्वेचे महत्त्व लक्षात घेता केंद्राकडून मिळालेल्या या मंजुरीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईच्या रेल्वे सेवेसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version