Central Railway : मध्य रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 34 लाखांचा दंड वसूल; मुंबई विभाग अ‍ॅक्शन मोडवर

Central Railway : मध्य रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 34 लाखांचा दंड वसूल; मुंबई विभाग अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक तिकीट तपासणी मोहीम राबवत 6,782 प्रवाशांवर कारवाई केली आहे. फुकट्या प्रवाशांकडून एकूण 34 लाख 64 हजार 305 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्य मार्ग, हार्बर मार्ग तसेच विविध स्थानकांवर अचानक धाडी, तटबंदी तपासणी आणि विशेष मोहिमांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, नेरूळ,पनवेल, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, लोणावळा, भिवंडी आणि दिवा या स्थानकावर 21 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा : Latur News : खासगी मालकीच्या भूखंडावरील बेकायदा बांधकाम भोवलं; लातूरच्या तहसीरदारांना महापालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस

कसारा आणि कर्जत-खोपोली दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकलमध्ये, स्थानकात 981 विनातिकीट प्रवाशांद्वारे दंडवसुली करून 4.79 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. पनवेल-नेरूळ मार्गावरील सखोल तपासणीत 452 प्रवाशांवर कारवाई करून 2.13 लाख रुपये जमा झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या तटबंदी तपासणीत 1,325 प्रवाशांकडून 5.81 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. कुर्ला, दादर, भायखळा आणि दिवा स्थानकांवरील विशेष तटबंदी मोहिमेत 696 प्रवाशांकडून 3.24 लाख रुपये वसूल करण्यात आले. कोपर, भिवंडी, कल्याण, दिवा आणि पनवेल परिसरात  तपासणीत 994 प्रवाशांकडून 4.86 लाख रुपये दंड आकारण्यात आला. 13 ते 15 सप्टेंबरदरम्यान मेल, एक्स्प्रेसमधील विशेष तपासणीत 650 प्रवाशांवर कारवाई करून 5.51 लाख रुपये वसूल झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version