जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दंगल सिनेमाची अभिनेत्री झायरा वसीमने रविवारी पहाटे सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओत विमानामध्ये आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचे तिने सांगितले. झायरा वसीमने आपल्या इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली होती.
जायरा शनिवारी नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइनन्सने प्रवास करत असतांना विमानात एका सहप्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
झायराच्या म्हणण्यानुसार तिने याबाबत विमानातील क्रूकडे तक्रार केली होती. झायराच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत विस्तारा एअरलाइनस्ने ट्विट करत, या संपूर्ण प्रकाराबाबत काटेकोरपणे चौकशी करण्यात येईल.
खरचं झायरासोबत अशा प्रकारची घटना घडली असेल तर, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले त्यांनी म्हटले होते.
अखेर झायराची विमानात छेड काढणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विकास सचदेवा असे या व्यक्तीचे नाव आहे. हा इसम विमानात पाठीमागच्या सीटवरुन झायराची छेडछाड काढत होता. मात्र, अरोपीच्या पत्नीने हे आरोप फेटाळले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.