Mumbai Bandra Accident : मुंबईत हृदयद्रावक अपघात! भरधाव इनोव्हाने 9 वर्षांच्या मुलाला चिरडलं; छातीवरून गाडीचे दोन्ही चाक गेले अन्….

Mumbai Bandra Accident : मुंबईत हृदयद्रावक अपघात! भरधाव इनोव्हाने 9 वर्षांच्या मुलाला चिरडलं; छातीवरून गाडीचे दोन्ही चाक गेले अन्….

मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका महिला कारचालकाने आठ वर्षीय मुलाला धडक दिल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील कारचालक मेघना रावल या पेशाने जिम ट्रेनर असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. हा अपघात दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडला, अशी माहिती झोनल डीसीपींनी दिली.

हेही वाचा- Badlapur Govinda Accident : बदलापूरच्या दहीहंडीत थरारक प्रसंग! सातव्या थरावरून गोविंदा थेट खाली कोसळला; सेफ्टी बेल्ट तुटल्याने घटना

मुंबईच्या वांद्रे मेहेबूब स्टुडिओच्या परिसरात दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास 9 वर्षांचा अंश गुप्ता या मुलाला भरधाव वेगाने इनोव्हा कार चालवत असलेल्या महिलेने चिरडले. यावेळी गाडीच पुढचं टायर मुलाच्या अंगावर होतं, त्यानंतर दुसर टायरवर पण मुलावर गेलं. मुलाने रस्ता क्रॉस केला नव्हता तो कडेनेच जात होता.

पण तरीही महिला ड्रायव्हरने गाडी त्याच्यावर चढवली, असे देखील प्रत्यक्षदर्शीन सांगितले. धक्कादायक म्हणजे कार चालक महिला होती. कार चालवताना ही महिला मोबाईल फोनवर बोलत होती. त्यानंतर त्याच गाडीतून मुलाला  होली फॅमिली रुग्णालयात अ डमीट केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करून मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अपघात प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version