मुंबई विमानतळाच्या नावात आता सुधारणा करण्यात आली आहे.
आता मुंबईचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे.
याआधी हे विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जात होतं.
मात्र आता या नावात महाराज हा शब्द जोडण्यात आला आहे.
या निर्णयाबद्दलची माहिती सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. आणि महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदनही केलं
Chhatrapati Shivaji International Airport is now Chhatrapati Shivaji ‘Maharaj’ International Airport. Congratulations to the people of Maharashtra,the long pending demand is now fulfilled.I thank PM @narendramodi ji for the concern towards the sentiments of the ppl of Maharashtra — Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 30, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.