MSRTC: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी नवा नियम; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ‘हे’ कार्ड अनिवार्य, अन्यथा…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे.
MSRTC: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी नवा नियम; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ‘हे’ कार्ड अनिवार्य, अन्यथा…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून शासनाच्या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता हे कार्ड सोबत बाळगणे आणि त्यामध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप करून ठेवणे गरजेचे ठरणार आहे. महामंडळाने राज्यभरात NCMC कार्डची नोंदणी आणि वितरण मोहीम वेगाने सुरू केली असून, आतापर्यंत 1 कोटी 11 लाखांहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणासाठी लागू आहे नवा नियम?

महामंडळाच्या परिपत्रकानुसार, 65 ते 75 वर्षांतील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना 1 सप्टेंबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच दिले जाणार आहे. यापुढे सवलत मिळवण्यासाठी केवळ ओळखपत्र पुरेसे ठरणार नाही. याशिवाय, भविष्यात इतर सवलतधारक प्रवाशांनाही या व्यवस्थेत टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.

कार्ड टॉप-अप करणेही आवश्यक

NCMC कार्ड मिळाल्यानंतर त्यात आवश्यक रक्कम भरून (Top-up) ठेवावी लागणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने सर्व आगारांना मानक कार्यप्रणाली (SOP) पाठवली आहे. प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात जाऊन नोंदणी, कार्ड वितरण आणि टॉप-अपची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तात्पुरती सूट

75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांबाबत मात्र महामंडळाने काहीसा दिलासा दिला आहे. त्यांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान बायोमेट्रिक पडताळणीत, विशेषतः हाताचे ठसे स्पष्ट न उमटण्याच्या अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी सक्तीला काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी काय कराल?

एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासापूर्वीच NCMC कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. कार्ड वेळेत काढून त्यात आवश्यक रक्कम भरल्यास सवलतीचे तिकीट सहज मिळेल आणि प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळता येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version