MPSC Exam : MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSCच्या महत्त्वाच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या कधी होणार परीक्षा

राज्यात सध्या स्पर्धा परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. अशातच एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.
MPSC Exam : MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MPSCच्या महत्त्वाच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या कधी होणार परीक्षा

राज्यात सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी चांगलेच संतापले असून पुण्यात आक्रमक झाले आहेत. नुकतंच कथिक पेपरफुटीची प्रकरणं समोर आल्यानेही एमपीएससीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्पर्धा परीक्षेच्या आयोजनातून समोर येणाऱ्या ढिसाळ कारभारामुळे राज्यभरातील विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करत आहेत.

या आंदोलनात विद्यमान एमपीएससी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आमदार रोहित पवार यांनीदेखील आपला सहभाग दाखवला. अशातच एमपीएससीने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीने महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलली आहे.

हेही वाचा- Sugar Price: सणासुदीच्या काळात साखर होणार स्वस्त? वाढत्या दरांना लगाम घालण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; ग्राहकांच्या खिशाला मिळणार मोठा दिलासा

एमपीएससी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली असून 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रांवर ऑफलाइन OMR पद्धतीने परीक्षा होणार असून परीक्षा नियोजनासाठी प्रशासकीय आणि जिल्हास्तरीय अहवालांचा आढावा घेण्यात येणार आहे.

सणासुदीचा काळ, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा तसेच इतर भरती परीक्षा आणि हिवाळी अधिवेशनाचाही परिणाम होणार आहे. प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि वेळेबाबत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी असे आदेश देण्यात आले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version