नागपुरात परिचारिका संघटनेचे आंदोलन

नागपुरात परिचारिका संघटनेचे आंदोलन
patients

आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिचारिका संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले असून २४ आणि २५ मे रोजी एक तास आंदोलन केले होते. २६ आणि २७ मे रोजी दिवसभर काम बंद ठेवूनही शासनाने लक्ष दिले नाही. परिचारकांचा संपाचा आजचा पाचवा दिवस आहे.  अखेर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने २८ पासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला असून नागपूरच्या मेयो आणि मेडिकलमधील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत असून अनेक रुग्णांना बरे होण्याआधीच सुट्टी देखील दिली जात आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी आता केली जात आहे.

मेडिकलमध्ये सुमारे एक हजार परिचारिका आहे. यापैकी सकाळी फक्त सोळा परिचारिका कामावर हजर होत्या. ९८४ परिचारिका संपात सहभागी होत्या. मेडिकलमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये फक्त ७ पिरचारिका होत्या.प्रशासनाकडून रूग्णांचे हाल होत आहे. वैद्यकिय अधीक्षकांचे कार्यालयस पुर्णपणे बंद आहे. कोलमडलेली रूग्णसेवा सुधारण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचं दिसून येत आहे. मेडिकल सुपरमधीव सर्व थिएटर बंद आहेत. रविवारी सकाळी मेडिकलमध्ये एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आहे. केवळ ट्रामा केअर युनिटमध्ये एक एमर्जन्सी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती आहे.

मेयो रूग्णायतील हीच परिस्थिती होती. वैद्यकिय आणि संशोधन संचालयाने शासिकीय वैद्यकिय महाविद्यालयातील प्राध्यपक आणि सहयोगी प्राध्यापक तसेच परिचारिका महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्यांना त्वरित कामावर रूजू होण्याचे आदेशही दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version