सुबोध भावेंनी शेअर केले आगामी चित्रपट ‘फुलराणी’चे मोशन पोस्टर

सुबोध भावेंनी शेअर केले आगामी चित्रपट ‘फुलराणी’चे मोशन पोस्टर

  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांना सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र वाढदिवसाचे औचित्य साधून सुबोध भावे यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सुबोध भावे यांचा आगामी चित्रपट ‘फुलराणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर सुबोध भावेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आगामी चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे.

  फुलराणी चित्रपटाचे मोशन पोस्टर सामायिक करत त्यांनी लिहिले की, ‘फुलराणी या माझ्या नविन चित्रपटामध्ये आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करत आहे. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. २०२२ मध्ये आधी चित्रपटगृहांमध्ये आणि मग बाकी माध्यमांतून फुलराणी प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे. फुलराणीचे पहिले मोशन पोस्टर खास तुमच्यासाठी! असे लिहित त्यांनी फुलराणी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

  अभिनेता सुबोध भावे यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक चित्रपटात त्यांची वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळते. मराठीसोवत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आगामी चित्रपट फुलराणी चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच वर्तमान, विजेता या चित्रपटांमध्येही ते झळकणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version