Nagesh Gaikwad Wife Dies: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील नागेश गायकवाड यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; चिमुकली श्रेया झाली पोरकी

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला
Nagesh Gaikwad Wife Dies: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील नागेश गायकवाड यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; चिमुकली श्रेया झाली पोरकी

पुणे : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेने हादरलेल्या गायकवाड कुटुंबावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुहेरी आघात

8 जुलै रोजी मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरला आणि तो प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. बचावकार्यादरम्यान नागेश गायकवाड यांचाही मृत्यू झाला. नागेश हे अवघे 26  वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता.

हेही वाचा: Maharashtra 7/12 Utara : सातबारावर नाव नसलेल्या 2.31 लाख शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; महसूल मंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

नागेश यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या एक वर्षाची मुलगी असल्याची माहिती आहे. वडिलांच्या निधनानंतर चिमुकली श्रेया हिच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले होते. नागेश यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या चिमुकल्या मुलीचे दृश्य अनेकांच्या काळजाला चटका लावणारे ठरले होते. वडील आपल्यापासून कायमचे दूर गेले आहेत, याची जाणीव नसलेल्या त्या चिमुरडीकडे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

आता पत्नीच्या मृत्यूने वाढली चिंता

नागेश यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासानंतरच घटनेमागील कारण समोर येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version