केरळमध्ये मान्सून २४ तासांत दाखल होणार

केरळमध्ये मान्सून २४ तासांत दाखल होणार

चातकाप्रमाणे प्रत्येकजणच पावसाकडे डोळे लावून बसला आहे. तर, पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे दररोज होत असणाऱ्या अतिप्रचंड उकाड्यापासूनही सर्वांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होणार
भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितल होतं की, ‘येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.’ भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ”बिपरजॉय चक्रीवादळाचं रुपांतर वेगाने तीव्र चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version