मुंबईतील अंधेरी येथील जुहू परिसरात रिमझिम पाऊसाला सुरवात झाली असून पाऊसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईसह ठाण्यात देखील पाऊस पडायला सुरुवात झाली असून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ठाणेकरांना उकडल्यापासून दिलासा मिळाला असून आतापर्यंत 01.78 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने उकाड्याने त्रस्त असलेले ठाणेकर सुखावले आहेत.
तर पालघर जिल्ह्याला उष्ण हवामानाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाचा हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
हेही वाचा- Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा! अनेक परिसरात पावसाची हजेरी
नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती मंदावलेली असताना विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाकडून 20 ते 23 जूनदरम्यान अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून वर्धा 43 अंश, नागपूर 42.4 अंश आणि अकोला 42 अंश सेल्सिअसवर तापमान आहे.
वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आहे. 22 व 23 जूनला बुलढाणा जिल्ह्याचाही अलर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान 23 जूनच्या सुमारास राज्याच्या आणखी काही भागांत मोसमी पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. यावेळी नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे व पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.