7 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मॉक ड्रिल होणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पोलिसांकडून मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला.
7 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मॉक ड्रिल होणार

मुंबई: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच, केंद्रीय गृहमंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर मंगळवारी पोलिसांकडून मॉक ड्रिलचा सराव करण्यात आला. यादरम्यान, आरपीएफ (RPF) यांचे पथक आणि स्निफर डॉगसोबत हा मॉक ड्रिल करण्यात आला.

हेही वाचा: महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या

7 मे रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत. यावेळी सर्व राज्यांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले जातील. तसेच, सुरक्षा यंत्रणांना देखील याचे आदेश दिले आहेत. यासह, आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावे याबद्दल नागरिकांना माहिती मिळावी, या हेतूने देशभरात मॉक ड्रिल होणार आहेत. त्यासोबतच, नागरी सुरक्षा अभ्यासाचा भाग म्हणूनही हे आदेश जारी करण्यात आले आहेत. जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करेल, तेव्हा स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याचे प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

मॉक ड्रिल म्हणजे काय?

मॉक ड्रिल हा एक प्रकारे पूर्वनियोजित अभ्यास असतो, ज्यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचे नाट्य रूपांतर केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत लोक कशी प्रतिक्रिया देतील हे या मॉक ड्रिलमधून पाहिले जाते. यादरम्यान, अचानक कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाला असे वातावरण तयार केले जाते. अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version