गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे सज्ज

गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे सज्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यासाठी सज्ज झाले आहेत. मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून महापालिकेकडून मेळाव्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पालिकेने मनसेला गुढीपाडवा मेळाव्यासाठी 24 अटींसह परवानगी दिली आहे.

येत्या 22 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. त्यामुळे पा़डव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मेळावा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज दाखल केला होता. अखेर पालिकेकडून मनसेचा अर्ज मान्य झाला असून पालिकेने मेळाव्यासाठी 24 अटींसह परवानगी दिली आहे. तसेच मुंबई पोलिसांनीही मनसेच्या मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असून सर्वांचे लक्ष मेळाव्याकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version