Pimpri Chinchwad News : विषारी दारूमुळे मृत्यूतांडव! दारू अड्ड्याची तोडफोड, आमदार रोहित पवारही आक्रमक; जाणून घ्या ताजी अपडेट

पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी आता पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Pimpri Chinchwad News : विषारी दारूमुळे मृत्यूतांडव! दारू अड्ड्याची तोडफोड, आमदार रोहित पवारही आक्रमक; जाणून घ्या ताजी अपडेट

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी आता पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे मृत्यू विषारी दारू मुळेच झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले आहे. या बाबत पोलीस तपास करत असून यामध्ये फॉरेन्सिक टीमदेखील पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली असून पुढील तपास करत आहे. याचबरोबर याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असल्याचे देखील सांगण्यात आले आहे, ही माहिती पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली. 

हेही वाचा : Pimpri Chinchwad News : पुणे- पिंपरी चिंचवड हादरवणाऱ्या प्रकरणात मोठी अपडेट! 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारू प्यायल्याने तब्बल १५ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने जर वेळीच दखल घेतली असती, तर ही दुर्घटना सहज टाळता आली असती, असा खळबळजनक आरोप शिरूरमधील शिवबा संघटनेने केला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या तयार होणारी ही विषारी गावठी दारू थेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सप्लाय केली जात होती. या गावठी दारूच्या भट्ट्यांवर आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी शिवबा संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे वारंवार पुराव्यांसह तक्रारी केल्या होत्या. अगदी विषारी दारूने भरलेल्या गाड्या पकडून देऊनही पोलिसांनी मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप शिवबा संघटनेचे माऊली घोडे यांनी केला आहे. जर दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी या रॅकेटवर कडक कारवाई केली असती, तर आज या १५ जणांचे प्राण वाचले असते, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकल्या गेलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार स्वतः संबंधित दारू अड्ड्यावर पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी लावलेले पत्रे उखडून टाकत काऊंटरची तोडफोड केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गरीब माणूस मेल्यानंतर आम्ही शांत बसलो तर राजकारणात आम्ही फक्त टाईमपास करायला आलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अशा वेळी सिस्टीम कमी पडते, त्यामुळे आम्हालाच आक्रमक व्हावं लागतं. लहान मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण सिस्टीम वेळेवर मदत करत नाही,” असंही ते म्हणाले. विषारी दारू प्रकरणानंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version