अधिवेशनासाठी नागपूरात आलेल्या आमदांरांची चांगलीच पंचायत झाली

अधिवेशनासाठी नागपूरात आलेल्या आमदांरांची चांगलीच पंचायत झाली

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपूरमधल्या अधिवेशनात आमदांची मोठी पंचायत झाली. आमदार निवास मधील B विंग मध्ये आज सकाळपासून पाणीच नसल्याने अनेक आमदारांना प्रातर्विधी आणि आंघोळीसाठी वाट पहावी लागली.

शेवटी 12 वाजेपर्यंत देखील पाणी न आल्याने अनेक आमदारांनी शेजारच्या विंग मधून पाणी मागवुन तयार व्हावे लागले. B विंग मधील 455 नंबर रूम मधील शिवसेना आमदार डॉ सुजित मिनचेकर यांना देखील तयार होण्यासाठी शेजारच्या विंग मधून पाणी मागवूनच तयार व्हावे लागले.

आमदार निवास व्यवस्थापनला वारंवार सांगून देखील पाणी उपलब्ध झाले नसल्याने आमदार डॉ मिनचेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version