ठाणे : साचलेल्या पाण्यात करंट लागून अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील 'यास्मिन पार्क' इमारतीबाहेर काल, बुधवारी रात्री 8.30 वाजता सुमारास आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला काही कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने करंट लागून तिचा मृत्यू झल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा : Maharashtra TET Scam: TET घोटाळ्याचे धागेदोरे थेट बिहार-हरियाणात; आणखी 3 आरोपींना बेड्या
आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला (वय 17) या अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टोरंट पॉवर कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच अल्पवयीन मुलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी केला आहे. या घटनेची माहिती देताना प्रशासनाने परिसरातील विद्युत सुरक्षा व्यवस्थेची तातडीने तपासणी करावी. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. मुंब्रा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस तपास करत असल्याचीही माहिती मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.