संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुण्यात बंदी

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुण्यात बंदी

दरवर्षी वर्षाच्या पहिल्याच म्हणजे 1 जानेवारीला पुण्यातील भिमा-कोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिक येतात.

या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठाणच्या संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांसह इतर 163 जणांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला.

ही जिल्हाबंदी 28 डिसेंबर- 1 जानेवारी या कालावधीसाठी केली आली आहे.

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. हा कार्यक्रम सुरक्षितरित्या पार पडावा, तसेच कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी 1 जानेवारीला सालाबादप्रमाणे अनेक नागरिक विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. हे 200 वे वर्ष होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते.

परंतु या कार्यक्रमाला गालबोट लागले होते. त्यामुळे सुरक्षिततेबाबतची अधिक खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version