राजकारण्यांची कमाल, संभाजी नगरात धमाल

राजकारण्यांची कमाल, संभाजी नगरात धमाल

छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचे बूट चोरीला गेल्याची घटना घडली आहे. महापौरांच्या घरासमोरुन भटक्या कुत्र्यांनी बुट पळवला असल्या कारणाने त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणाच कामाला लागली आहे. विशेष म्हणजे तीन संशयित कुत्रेही पकडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कुत्र्यांनी बूट पळवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला १५ हजारांचा बूट घरासमोर काढून ठेवला होता. दरम्यान यावेळी घराच्या दारासमोरून भटक्या कुत्र्याने तो बूट पळवला. या घटनेत सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन संशयित कुत्र्यांना पकडले. पण बूट नेमका कोणत्या कुत्र्याने पळवला हे कसं शोधावे असा प्रश्न आता यंत्रणेला पडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version