‘अमरावती घटनेच्या मास्टरमाईंड मंत्री यशोमती ठाकूर’ – अनिल बोंडे

‘अमरावती घटनेच्या मास्टरमाईंड मंत्री यशोमती ठाकूर’ – अनिल बोंडे

अमरावती घटनेच्या खऱ्या मास्टरमाईंड पालकमंत्री यशोमती ठाकूर आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. तसेच यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळे त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे.

अमरावतीमधील अचलपूर शहरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने काढण्यात आले. यावेळी अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केला आहे. तसेच यशोमती ठाकूर अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला आहे.

अमरावतीत संचारबंदीचा दुसरा दिवस

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा शहरातील संचारबंदीचा आज दुसरा दिवस आहे. अचलपूर शहरात रविवारी रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून पोलिसांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल रात्री १०च्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांची अतिरिक्त तुकडीसुद्धा बोलवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version