विरारचे सुपुत्र चीनच्या सीमेवर शहीद

विरारचे सुपुत्र चीनच्या सीमेवर शहीद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली  

विरारचे सुपुत्र मेजर प्रसाद गणेश महाडिक चीनच्या सीमेवर शहीद झालेत. 30 डिसेंबरला टँकला लागलेल्या आगीत त्यांची प्राणज्योत मालवळी आहे. विरार पश्चिमेकडील यशवंत सोसायटीत राहणारे महाडिक हे गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावचे सुपुत्र होते.

2010 पासून ते अरुणाचल प्रदेशातील तवंग भागात दारुगोळा चेक करण्याचे काम करत होते. 31 डिसेंबरलाही नेहमीप्रमाणे दारुगोळा चेक करण्यासाठी गेले असता सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला. आणि या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले. मेजर प्रसाद महाडिक यांचं पार्थिव मंगळवारी सकाळी विरारच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version