जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेले दिसत आहे .मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मराठा आंदोलकांनी सोमवारी (23 जुलै) रोजी जलसमाधी आंदोलन केले.
यामध्ये गोदावरी नदीत आंदोलक तरुणानं उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.
वारकरी पंढरपूरहून परतत असल्यानं त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर बुधवारी (25 जुलै) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास अडथळा ठरू नये, म्हणून सातारा, पंढरपूर, पुणे आणि मुंबईला महाराष्ट्र बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.
औरंगाबाद – पुणे महामार्गावर मोर्चेकऱ्यांचा ठिय्या
नवी मुंबई – कामोठे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळले
सोलापूर – तुळजापूर रोडवरील पर्ल गार्डन समोर एसटी बस वर दगडफेक, दोन बसचे नुकसान
सांगली – मराठा आंदोलनातमराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसले असल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हिंगोली – खालापूर येथे आंदोलकांनी पोलिसांची गाडी जाळली.
औरंगाबाद – मराठा समाज आंदोलकांनी रुग्णवाहिका फोडली.
पुणे – निषेध बाईक रॅलीला सुरुवात होणार, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त.
मुंबई – चेंबूरमध्ये मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले, भाईंदरमध्ये रास्ता रोको आंदोलन.
मराठी क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू…
मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.