Manoj Jarange Patil Health update: मनोज जरांगेंची तब्येत चिंताजनक? बीपी-शुगर कमी, उपचार नाकारल्याने प्रशासनासमोर मोठं संकट

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून प्रकृती खालावली आहे
Manoj Jarange Patil Health update: मनोज जरांगेंची तब्येत चिंताजनक? बीपी-शुगर कमी, उपचार नाकारल्याने प्रशासनासमोर मोठं संकट

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने वैद्यकीय पथकाने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

जरांगे पाटील यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी उपचार घेण्यासोबतच आरोग्य तपासणी करण्यासही नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनासमोर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

उपोषणस्थळी आरोग्य विभागाचे पथक रात्री दोन वेळा दाखल झाले होते. पहिल्यांदा आलेल्या पथकाला जरांगे यांनी प्रतिसाद न दिल्याने परतावे लागले. त्यानंतर रात्री सुमारे 1.15 वाजता डॉक्टरांचे पथक पुन्हा त्यांच्या तपासणीसाठी पोहोचले. बराच वेळ प्रयत्न करूनही तपासणीसाठी संमती मिळाली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version