Manoj Jarange Patil : महत्त्वाची बातमी! जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 3 महिन्यांची मुदतवाढ; अन्यथा उपोषण नाही, थेट मुंबई काठणार

Manoj Jarange Patil : महत्त्वाची बातमी! जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 3 महिन्यांची मुदतवाढ; अन्यथा उपोषण नाही, थेट मुंबई काठणार

पाटोदा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 20 दिवसांपासून उपोषणावरून अजून दोन दिवसांपासून मुंबईच्या दिशेने प्रवासा निघाले आहेत. दरम्यान, आज 17 सप्टेंबर रोजी सकाळीच सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पाटोद्याला दाखल झाले. यावेळी शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस आणि मंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Shivsena Symbol Hearing: निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देताना सर्व आवश्यक बाबी तपासल्या; शिंदे गटाचा न्यायालयात युक्तिवाद

दरम्यान या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा तरत उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती केली. गॅझेटियरची अंमलबजावणी जीआर काढून काढावीच लागेल. 58 लाख नोंदी कमी होणार नाही हे लेखी द्यावं लागेल. पुन्हा-पुन्हा तोच तोच घोळ नको. 58 लाख नोंदी, त्यांचं वाटप करणं वॅलिडिटी देण्यासंदर्भात लेखी द्यावं मुख्यमंत्रीसाहेब असतील त्यांनी प्रेस समोर येऊन शब्द द्यावा, अशी मागणी यावेळी जरांगे पाटील यांनी केली. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी त्यांनी सरकारला 90 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 90 दिवसात सरकारने सातारा गॅझेट लागू करावं. या 90 दिवसात आपण राज्यभर दौरा करत समाजात जनजागृती निर्माण करणार असल्याचंही जरांगेंनी सांगितलं. याशिवाय हैदराबाद गॅझेटनुसार 58 लाख नोंदी आढळल्या आहेत. त्यातील एकही नोंद कमी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करू पण आता नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version