Maharashtra Politics : मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?; हालचालींना वेग

Maharashtra Politics : मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?; हालचालींना वेग

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. लवकरट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याची जबाबदारी 3 मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचे समजते. यापूर्वी 2022 साली तब्बल 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत वेगळा गट स्थापन केला. तर काही महिन्यांपूर्वी ठाकरेंचे सहा खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले. तर ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार राहुल शेवाळेदेखील शिंदे गटात आले. त्यामुळे शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरूच असून आता आणखी 14 आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : Mumbai Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची तब्बल 20 जणांना धडक, भाजप आमदाराच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

जून 2022 मध्ये 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर 2024 च्या विधान सभेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. यात त्याचे 20 आमदार निवडून आले. मधल्या काळात अनेक छोट-मोठे नेता, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. तर ठाकरेंना मोठा धक्का देत लोकसभेचे 6 खासदारदेखील शिंदेंसोबत गेले. अशाने ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना डॅमेज करण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांनी जर साथ सोडली तर केवळ 6 आमदारांसह उद्धव ठाकरेंची मशाल कुठवलं तेवत राहणार, हा प्रश्न उपस्थित होईल. तसेच 14 आमदार नवरात्रीपूर्वी शिंदे गटात जाणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version