Weather Update : परतीच्या पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात काय परिस्थिती

राज्यात अचानक दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मान डोकावली आहे. महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत असून यावेळी काही ठिकाणी परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे.
Weather Update : परतीच्या पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह कोकणात काय परिस्थिती

राज्यात अचानक दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मान डोकावली आहे. महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत असून यावेळी काही ठिकाणी परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान हवामान विभागाने 24 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृश जोरदार पावसाने हजेरी लावली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- Fuel Prices Hike Soon : पेट्रोलचे दर 1,000 रुपये प्रति लिटर? पेट्रोलियम मंत्र्यांचा इशारा; इंधन तुटवड्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात ढगांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या नाशिककरांना पावसामुळे दिलासा मिळणार असून हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज होता. नाशिक जिल्ह्यात हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. 50 दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाचे बजेट पूर्णता कोलमडले आहे. शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी, मका पावसा अभावी करपले आहेत. शेतातील उत्पादनाशिवाय उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत नसल्याने दुष्काळाच्या झळा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनाही सोसाव्या लागणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version