नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीमध्ये अवकाळी पाऊस पडला त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही मोठे चढ-उतार पाहायला मिळाला असून हवेतील गारवा अधिक वाढला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड लहरींमुळे देशाच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण जानेवारी महिना राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
ढगाळ वातावरण आणि थंडीचा हा खेळ किमान आठवडाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसानंतर आता राज्यावर ढगाळ हवामानाचे सावट असून, पुढील काही दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने राज्यात पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होईल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, चंदीगड या भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
यावेळी गोंदियात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून धुळ्यात 8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. तसेच नागपूरमध्ये 7.8 तापमानाची नोंद झाली. त्याचसोबत पुण्यात तापमानामध्ये तीन अंश सेल्सिअसने गट नोंदवण्यात आली पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. विदर्भात देखील कडाक्याची थंडी पडण्याचीच शक्यता आहे. तसेच तामिळनाडू, केरळमध्ये 8, 9 आणि 10 जानेवारी रोजी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आली आहे. देशातील काही ठिकाणी थंडी, अवकाळी पाऊस आणि धुकं तसेच हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.