‘पूरग्रस्तांना बँक खात्यातच मदत;रोख मदत देणार नाही’

‘पूरग्रस्तांना बँक खात्यातच मदत;रोख मदत देणार नाही’

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे प्रचंड नुकसान झालं असून पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. शुक्रवारपासून ही रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

‘हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात’, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तसेच, ‘पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राने पथक पाठवावं. नेते, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते फिरत आहेत. त्यांनीही पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती द्यावी. आमची इच्छा आहे, त्यांनी सुद्धा कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट आलं ते पाहावं’, असंदेखील वडेट्टीवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version