Election Result 2025: नगरपालिका-नगरपंचायत निकालांचा मोठा आढावा; महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
Election Result 2025: नगरपालिका-नगरपंचायत निकालांचा मोठा आढावा; महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

Election Result 2025: महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात कुठे सत्ताबदल, तर कुठे सत्ताधाऱ्यांची पकड कायम राहिल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवकांसोबतच नगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष होते. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीनंतर एकामागून एक निकाल स्पष्ट होत गेले आणि विविध पक्षांचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले.

भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच स्थानिक आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनीही अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागले, तर काही ठिकाणी अनपेक्षित विजयामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

खाली महाराष्ट्रातील विविध नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील विजयी नगराध्यक्षांची सविस्तर यादी देण्यात येत आहे. ही यादी अधिकृत निकालांवर आधारित असून पुढील अपडेट्ससह बदल होण्याची शक्यता आहे.

विजयी नगराध्यक्षांची यादी:
चंदगड – सुनील कावनेकर (भाजप)
अनगर – प्राजक्ता पाटील (भाजप)
जामनेर – साधना महाजन (भाजप)
दोंडाईचा – नयनकुमार रावल (भाजप)
मेढा – रुपाली वारागडे (भाजप)
करमाळा – मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
मलकापूर – रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
हातकणंगले – अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
औसा – परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
आटपाडी – यु.टी. जाधव (भाजप)
उरण – भावना घाणेकर (शरद पवार गट)
पन्हाळा – जयश्री पवार (जनसुराज्य शक्ती पक्ष)
तळेगाव – संतोष दाभाडे (भाजप)
मुखेड – बालाजी खतगावकर (शिंदे गट)
अलिबाग – अक्षया नाईक (शेकाप)
म्हसवड – पूजा वीरकर (भाजप)
फुलंब्री – राजेंद्र ठोंबरे (ठाकरे गट)
गंगापूर – संजय जाधव (अजित पवार गट)
अंबाजोगाई – नंदकिशोर मुंदडा
कळमनुरी – आश्लेषा चौधरी (शिंदे गट)
वाई – अनिल सावंत (भाजप)
जिंतूर – प्रताप देशमुख (भाजप)
पालघर – उत्तम घरत (शिंदे गट)
तासगाव – विजया पाटील (स्वाभिमानी विकास आघाडी)
जेजुरी – जयदीप बारभाई (अजित पवार गट)
उरूण ईश्वरपूर – आनंदराव मलगुंडे (शरद पवार गट)
इंदापूर – भरत शाह (अजित पवार गट)
मैंदर्गी – अंजली बाजारमठ (भाजप)
मालवण – ममता वराडकर (शिंदे गट)
पाचगणी – दिलीप बगाडे (अजित पवार गट पुरस्कृत)
सावंतवाडी – श्रद्धाराजे भोसले (भाजप)
कणकवली – संदेश पारकर (शहरविकास आघाडी)
गेवराई – गीता पवार (भाजप)
भोर – रामचंद्र आवारे (अजित पवार गट)
गंगाखेड – उर्मिला केंद्रे (अजित पवार गट)
देवळाली प्रवरा – सत्यजित कदम (भाजप)
अक्कलकोट – मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
रोहा – वनश्री समीर शेडगे (अजित पवार गट)
धामणगाव – डॉ. अर्चना रोठे (भाजप)
विटा – काजल संजय म्हेत्रे (शिंदे गट)
वडगाव मावळ – आबोली ढोरे (अजित पवार गट)
पेण – प्रीतम पाटील (भाजप)
सासवड – आनंदी जगताप (भाजप)
मंगळवेढा – सुनंदा बबनराव आवताडे (भाजप)
तुळजापूर – पिंटू गांगणे (भाजप)
चिपळूण – उमेश सकपाळ (शिंदे गट)
खेड – माधवी बुटाला (शिवसेना)
राजापूर – हुस्नबानू खलिपे (काँग्रेस)
धर्माबाद – संगीता बोलमवार (मराठवाडा जनहित पार्टी)
बिलोली – संतोष कुलकर्णी (मराठवाडा जनहित पार्टी)
डहाणू – राजेंद्र माच्छी (शिंदे गट)
वैजापूर – दिनेश परदेशी (भाजप)
पैठण – विद्या कावसानकर (शिंदे गट)
सिल्लोड – समीर सत्तार (शिंदे गट)
माथेरान – चंद्रकांत चौधरी (शिंदे गट)
बुलढाणा – पूजा संजय गायकवाड (शिंदे गट)
महाबळेश्वर – सुनील शिंदे (अजित पवार गट)
अंबरनाथ – तेजश्री करंजुले (भाजप)
खोपोली – कुलदीपक शेंडे (शिंदे गट)
कर्जत – पुष्पा दगडे (अजित पवार गट)
अंबड – देवयानी कुलकर्णी (भाजप)
लोणावळा – राजेंद्र सोनावणे (अजित पवार गट)
बारामती – सचिन सातव (अजित पवार गट)
बदलापूर – रुचिता घोरपडे (भाजप)
रत्नागिरी – शिल्पा सुर्वे (शिंदे गट)
श्रीवर्धन – अतुल चौगुले (ठाकरे गट)

राज्यभरातील या निकालांमुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून काही अनुभवी नेत्यांनी पुन्हा एकदा मतदारांचा विश्वास जिंकला आहे. आगामी काळात या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संबंधित शहरांचा विकास कोणत्या दिशेने होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version