Rani Mukerji: ‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी…’, केसांत अबोलीच्या फुलांचा गजरा, हातात हिरवा चुडा; राणी मुखर्जीच्या लुकने वेधलं लक्ष

मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात बुधवार, 9 सप्टेंबर रोजी 62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यात स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री
Rani Mukerji: ‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी…’, केसांत अबोलीच्या फुलांचा गजरा, हातात हिरवा चुडा; राणी मुखर्जीच्या लुकने वेधलं लक्ष

मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात बुधवार, 9 सप्टेंबर रोजी 62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यात स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी हिरवी साडी परिधान केली असून हिरवा चुडा, केसांत अबोलीच्या फुलांचा गजरा माळलेला होता. त्यांचा हा मराठमोळा लूक सर्वांचे लक्ष वेधत होता. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणाची  सुरूवात मराठी भाषेतून केली.

हेही वाचा – 62nd Maharashtra State Marathi Film Awards : ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ लेखक-पटकथाकार सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

"महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. अशी सुरुवात करत त्यांनी महाराष्ट्र भूमीचे अनेक आभार मानले. 'माझा जन्म याच शहरात झाला आणि मी इथेच वाढले. ही आपली स्वतःची मुंबई, स्वप्नांचे शहर. इथेच मी आयुष्याचे धडे शिकले आणि याच शहराने मला सिनेमाबद्दलही शिकवले. मी इथे यश आणि अपयश, दोन्ही अनुभवले आहे. म्हणूनच आजचा हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत खास आहे, कारण हा सन्मान मला माझ्या लोकांकडून मिळाला आहे. मी खूप लहान वयातच या इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकले. त्यावेळी मला कोणाचाही पाठिंबा नव्हता, मी फक्त मनापासून माझे काम करत राहिले. माझ्यासाठी सिनेमा हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे आपण लोकांना समजून घेतो.' असे त्यांनी म्हटले.

यापूर्वी त्यांना नवी दिल्ली येथे आयोजित 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. साथिया, हम तुम आणि वीर-झारा या सिनेमांपासून ते मर्दानी, हिचकी, मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे अशा दमदार चित्रपटांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. आता त्या कोणत्या आगामी चित्रपटांत दिसणार आहेत, यासाठी चाहते उत्सुक आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version