विधानभवनातील महाराजांचा पुतळा बदलणार

विधानभवनातील महाराजांचा पुतळा बदलणार

विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे लवकरच हा पुतळा बदलला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बदलण्यात येणार आहे. या पुतळ्यावर काही आमदारांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र, महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नाही, असा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर विधीमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बसवला जाणार आहे.

विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्याचे काम सर जे. जे. कला महाविद्यालयास देण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version