Mahadev Jankar On Ajit Pawar Death : "…अन् दादांसोबतचा तो प्रवास करता आला नाही" महादेव जानकर अजित पवारांच्या विमानातून करणार होते प्रवास

अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर महादेव जानकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
Mahadev Jankar On Ajit Pawar Death : "…अन् दादांसोबतचा तो प्रवास करता आला नाही" महादेव जानकर अजित पवारांच्या विमानातून करणार होते प्रवास

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे येत असताना पुणे–बारामती परिसरात त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर महादेव जानकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. महादेव जानकर यांच सुदैव की ते अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ज्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्या विमानात महादेव जानकर गेले नाही. अजित पवार ज्या विमानात होते त्याच विमानातून ते प्रवास करणार होते मात्र त्यांना झोप लागली आणि महादेव जानकर यांनी प्रवास करण टाळलं. अजित पवार आणि महादेव जानकर हे एकत्र दहिवडीमध्ये एकत्र सभा घेणार होते. मात्र झोप लागल्यामुळे त्यांनी प्रवास करण टाळलं आणि त्यांचा जीव वाचला. अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. 

हेही वाचा- Ajit Pawar : ‘या वस्तू तशाच राहिल्या पाहिजे’ अशा दिल्या होत्या अजित दादांनी सूचना
महादेव जानकर म्हणाले की, “अजित पवारांचा 24,25 आणि 26 तीन दिवस कंटिन्यू फोन येत होता, आणि 26 ला संध्याकाळी आमचा नंदगडला राष्ट्रीय समाज पक्षाचा संगम रायणाचा राज्यभिषेकाचा कार्यक्रम असतो. मला असं म्हटले होते की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची, माझी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती साताऱ्याला झाली आहे. तर आपण साताऱ्याच्या सभेला सोबतच जाऊ, असं अजित पवार मला म्हणाले होते. विशेष म्हणजे नगरपालिका बारामतीला सीट-राष्ट्रीय समाज पक्षाची आली तेव्हा ते म्हणले की मला तुमच्या एका नगरसेवकाची कॉप्ट करण्यासाठी मदत लागणार आहे. पुढे माग आपण राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करायला आपण तयार आहे असं अजित पवार मला म्हणाले. माझं आणि त्यांच जुळत होत पण दुर्दैव या महाराष्ट्राचं नशीब खराब म्हणायच की काय समजत नाही. आमदार खासदार होण सोप असत पण नेता होण कठिण असत आणि एवढे लोकनेते अशा प्रकारे आपल्याला सोडून गेले हे भयानक नुकसान झालं आहे राज्याच. अजित पवारांनी मला 2 तारखेला जायच असं म्हटलं होत. बेळगाववरून यायला मला पहाटेचे तीन वाजले होते. त्यामुळे मी झोपलो होतो, पण अजित पवारांच्या जाण्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version