लोकलच्या लगेज डब्यात रंगली दारुपार्टी, व्हिडिओ व्हायरल

लोकलच्या लगेज डब्यात रंगली दारुपार्टी, व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

असे म्हणतात दारु पिणाऱ्याला वेळ, ठिकाणाचं भान नसत. दारु पिणारे केव्हाही आणि कुठेही सुरु होतात. त्यांना इतरांची पर्वा नसते. अशाच प्रकारचे एक उदाहरण मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकलच्या डब्यात पाहायला मिळाले आहे. रेल्वे प्रवाशांचा एक समूह भरदिवसा मद्यपान करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

लोकलच्या लगेज डब्ब्यात दिवसाढवळ्या मद्यप्राशन होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलमध्ये मद्यपींची दारु पार्टी सुरु होती. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमध्ये मद्यपींच्या वागण्याचा इतर प्रवाशांना त्रास होत होता. मात्र, तरीही त्यांची दारु पार्टी जोमात सुरु होती. एका रेल्वे प्रवाशाने हा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version