नागपूरमध्ये अनेकांनी काढले बार विकायला, 850 पैंकी 320 बार विक्रीला

नागपूरमध्ये अनेकांनी काढले बार विकायला, 850 पैंकी 320 बार विक्रीला

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500मीटरच्या आतील बार आणि दारु दुकानांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बंदी आणली. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे.

 

त्यामुळे आता बार मालकांनी थेट बार भाड्याने देणे किंवा विक्रीला काढल्याचं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. एकट्या नागपूर शहरात 850 बार असून त्यापैरी 320 बार विक्रीला काढण्यात आले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बार आणि दारूच्या दुकानात काम करणाऱ्या अनेकांचा रोजगार गेला आहे. कामगारांना द्यायला बार मालकांनकडे पैसे नसल्यानेच त्यांनी बार विक्रीचा निर्णय घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version