Jalgaon: तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा; 5 जण पोलिसांच्या कचाट्यात, जळगावातील घटनेने खळबळ

जामनेर तालुक्यातील लिहेतांडा येथे कपिल चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक झाली आहे
Jalgaon: तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा; 5 जण पोलिसांच्या कचाट्यात, जळगावातील घटनेने खळबळ

जामनेर: जामनेर तालुक्यातील लिहेतांडा परिसरात 29  वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पहूर पोलिसांनी पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव कपिल बंडू चव्हाण (वय 29) असून तो लिहेतांडा, ता. जामनेर येथील रहिवासी होता. कपिल याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

या घटनेनंतर कपिलच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या तक्रारीत काही व्यक्तींकडून कपिलला कथितरीत्या शारीरिक तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित त्रासाला कंटाळून कपिलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी नंदिनी कपिल चव्हाण, कुलीबाई उर्फ यशोदाबाई गणेश राठोड, गणेश भंगी राठोड, कु. सोनू गणेश राठोड आणि आकाश गणेश राठोड अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आरोपींपैकी गणेश भंगी राठोड आणि आकाश गणेश राठोड या दोघांना 14 ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबतही तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

कपिलला नेमका कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता, या त्रासामागील कारण काय होते आणि आत्महत्येच्या घटनेशी संबंधित इतर परिस्थिती काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version