बुलढाणा : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेक्स्यू करताना वनविभागाच्या पथकाकडून एक चूक झाला आणि बिबट्या थेट पिंजऱ्यातून निसट्याची घटना नुकतीच समोर आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वैरागड गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र, त्यानंतर याच बिबट्याला पिंजऱ्यात कैद करुन विहिरीबाहेर आणत असतानाच अचानक पिंजरा हलला आणि बिबट्या त्यामधून बाहेर पडला.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याता शोधात असलेला हा बिबट्या वैरागड गावातील एक विहिरीत पडला होता. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच तातडीने वनविभागाते कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजऱ्यातही कैद केले आणि त्याला विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती.
गावकऱ्यांची धावपळ
मात्र, बिबट्याला पिंजऱ्यासह वर आणत असतानाच अचानकपणे पिंजरा हलला. त्याचवेळी बिबट्याने पिंजऱ्यातून बाहेर उडी घेतली. बिबट्या अचानक मोकळा झाल्याचे दिसताच घटनास्थळी असलेले कर्मचारी आणि गावकऱ्यांची एकच धांदल उडाली. बिबट्या आपल्यावर हल्ला करेल याच भीतीने सर्व नागरिक आणि वन कर्मचारी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सैरावैरा पळक होते. धक्कादायक म्हणजे, बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तो परत वनविभागाच्या हाती लागल नाही, अशी माहिती समोर येत आहे.
https://youtube.com/shorts/Y69XNolrJSE?si=RKyQrSXYuJV_rsza
या संपूर्ण धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असून, बिबट्या पिंजऱ्यातून निसटल्यानंतर झालेली पळापळ या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान, बिबट्या मोकाट असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.