'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच 1,500 रुपये जमा होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 September नंतर August महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू होऊ शकते.
24 September नंतर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार?
पात्र महिलांच्या बँक खात्यात August महिन्याचे 1,500 रुपये टप्प्याटप्प्याने पाठवले जातील. गणेश विसर्जनाच्या काळात हे वाटप सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सणाच्या दिवसात महिलांना मदत मिळेल. पण 24 September ही फक्त संभाव्य तारीख आहे, शासनाने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
विलंबाचे कारण काय?
तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ऑगस्टचा हप्ता लांबला आहे. आधीच हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, पण काही प्रक्रियांमुळे उशीर झाला. आता निधी वाटपाची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात आहे आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे रक्कम जमा केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.