कुलभूषण जाधव दोषीच – इम्रान खान

कुलभूषण जाधव दोषीच – इम्रान खान

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटला सुरू असून या खटल्यात भारताला मोठं यश प्राप्त झाले आहे. मात्र या खटल्यात पाकिस्तानलाच यश मिळाल्याचे पाकिस्तानी मीडियाने म्हटलं आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ICJने कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यास सांगितले नसल्याने आम्हाला आनंद वाटतं आहे. पाकिस्तानी नागरिकांबरोबर झालेल्या अन्यायासाठी कुलभूषण जाधव हे दोषी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं ट्विटमध्ये इम्रान खान काय म्हणाले ?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत कुलभूषण जाधव यांच्या खटल्यावर प्रतिक्रिया दिली.

ICJने कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यास सांगितले नसल्याने आम्हाला आनंद वाटतं आहे.

पाकिस्तानी नागरिकांबरोबर झालेल्या अन्यायासाठी कुलभूषण जाधव हे दोषी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही या खटल्यावर कायदेशीर कारवाई करू असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं ?

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचे ताशेरे आंतरराष्ट्रीय कोर्टाने ओढले.

भारताला काऊन्सिलर ऍक्सेस न देणं हे व्हिएन्ना कराराचं उल्लंघन होतं.

त्यामुळे भारताला काऊन्सिलर ऍक्सेस मिळणार आहे.

16 पैकी 15 न्यायाधिशांनी भारताच्या बाजूने निकाल दिला.

पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या निकालाला स्थगिती देत या शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version