कुलभूषण जाधव प्रकरणी 15 मे रोजी होणार सुनावणी

कुलभूषण जाधव प्रकरणी 15 मे रोजी होणार सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांची 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडणार आहेत. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने 10 एप्रिल रोजी कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

 

यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगाने हालचाली करत आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे हा मुद्दा उपस्थित केला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतरही पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version