मासेमारी व शेती व्यवसायामूळे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात मोलाची भर (18% ) टाकीत असताना अशा व्यवसाय-उद्योगांना सोयी सूविधांची केंद्रसरकारने तरतूद करण्याऐवजी ,डिझेलचे दर भरमसाट वाढवून मच्छिमारी व्यवसायाची कोंडी केली आहे.
अंधेरी पश्चिममधल्या वेसावा कोळीवाडा येथे उद्या सोमवार दिनांक 10 सप्टेंबर 2018 रोजी संध्याकाळी 4 च्या सुमारास भव्य निषेध प्रदर्षण होणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या डिझेल ईंधनाच्या दरवाढीच्या निषेधार्थ जवळपास 600 ते 800 कोळी बांधव वेसावा येथील बाजार गल्ली बंदर येथे जमणार आहेत व भारत सरकारच्या ह्या निर्णयाचा विरोध घोषणाबाजी व बँनर लावुन करतील.
कोळी बांधवांच्या यांत्रिकी नौका (ट्राँलर) ह्या डिझेलवरच चालत असतात व भाववाढीच्या ह्या जालीम निर्णयामुळे मच्छिमार कोळी बांधवांचा मासेमारीचा व्यवसाय संपवण्याचाच घात ह्या सरकारने केले असल्याचा कोळी बांधव विरोध करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.