शिवाजी विद्यापीठात काँग्रेस विद्यार्थी सेनेचं आंदोलन

शिवाजी विद्यापीठात काँग्रेस विद्यार्थी सेनेचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या पहिल्या शंभर यादीत शिवाजी विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी पहिल्या 28 व्या यादीत असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा क्रमांक घसरला आहे याचा निषेध करत आणि याला सर्वस्वी कुलगुरू देवानंद शिंदे यांना जबाबदार धरत काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेनं आंदोलन केले.

मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने शिवाजी विद्यापीठाकडे कुलगुरूंचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कुलगुरू हरवले असल्याची पत्रके विद्यापीठच्या गेटवर चिकटवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version