Kolhapur Crime: मुलांचे कपडे घेण्यासाठी घरी आली पत्नी; पतीने थेट गळाच चिरला, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातील योगेश्वर कॉलनीत कौटुंबिक वादातून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली.
Kolhapur Crime:  मुलांचे कपडे घेण्यासाठी घरी आली पत्नी; पतीने थेट गळाच चिरला, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातील योगेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश कदम आणि दिपाली कदम यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. या वादातून दिपाली काही दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलांसह माहेरी आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे कपडे आणण्यासाठी दिपाली गणेशच्या घरी आली होती. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे पर्यवसान संतापात झाले आणि गणेशने धारदार हत्याराने दिपालीच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दिपालीचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयित आरोपी गणेश कदम स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हत्येमागील नेमके कारण, घटनेचा क्रम आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गणेश आणि दिपाली यांना श्री (4) आणि स्वरा (7) अशी दोन मुले आहेत. आईच्या मृत्यूमुळे आणि वडिलांवर झालेल्या कारवाईमुळे दोन्ही चिमुकली मुले अनाथ झाली आहेत. या घटनेने योगेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version