Ratnagiri Accident: खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी, महिला गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भरणे नाका परिसरात मुंबई-रत्नागिरी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.
Ratnagiri Accident: खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी, महिला गंभीर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भरणे नाका परिसरात मुंबई-रत्नागिरी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. गणेशमूर्ती घेऊन साखरप्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वारकरी मठासमोर हा अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की, वॅगनआर कारची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली. तर गणेशमूर्ती घेऊन जाणारा टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

या धडकेत टेम्पोमधून नेण्यात येत असलेल्या गणेशमूर्तींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, वॅगनआरमधून रोहन बाळकृष्ण सराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे बदलापूरहून गणपतीपुळेकडे जात होते. अपघातानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version