अनेक शतकांनंतर शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले होणार

अनेक शतकांनंतर शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले होणार

बहुचर्चित शबरीमाला येथील अयप्पा मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज महिलांसाठी खुले होणार आहे. पण काही कर्मठांकडून आजही मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध दर्शवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये या मागणीसाठी महिलाच जास्त आक्रमक दिसत आहेत. काल एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. सुप्रीम कोर्टाचा महिला प्रवेशाचा निर्णय म्हणजे स्थानिकांच्या भावनांशी खेळ करण्यासारखं आहे, असं या महिलेचं म्हणणं आहे.

महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकूण 1000 सुरक्षा कर्मचारी, 800 पुरुष व 200 महिला तैनात आहेत. तसंच 500 सुरक्षाकर्मीही तैनात करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version