डोंबिवलीत महापौर, नगरसेवक, पदाधिकारी आणि स्वत: खासदारांनी रात्रभर उभं राहून काम करून घेतलं

डोंबिवलीत महापौर, नगरसेवक, पदाधिकारी आणि स्वत: खासदारांनी  रात्रभर उभं राहून काम करून घेतलं

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपचे नगरसेवक आपल्या प्रभागातील रस्ते दुरुस्त करून घेण्यासाठी प्रशासनाकडून काम करून घेताना पाहायला मिळतंय. नागरिकांना होणारा त्रास आणि खड्डेमय मुक्त शहर करण्याचा ध्यास लोक प्रतिनिधींनी घेतलेला दिसतोय.

शिवसेनेच्यावतीने खासदारांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवल्यानंतर महापौर नगरसेवक, पदाधिकारी आणि स्वत: खासदार  रात्रभर उभं राहून काम करून घेताना डोंबिवलीत मिळाले.

प्रशासन काम करत नाही, कामात दिरंगाई करते. त्यासाठी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते म्हणून राजकारण्यांनी ही धसका घेतलेला दिसतोय. उशिरा का होईना पण आयुक्तांच्या आदेशाने अधिकारी काम करताना दिसल्याचं समाधान भाजप नगरसेवक करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version