म्हणून ‘त्यांनी’ केली 1 लाख कडूलिंबांच्या झाडांची लागवड

म्हणून ‘त्यांनी’ केली 1 लाख कडूलिंबांच्या झाडांची लागवड

जय महाराष्ट्र न्यूज, नगर

 

कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देणाऱ्या झाडांच्या लागवडीचे प्रमाण काही वर्षांत कमी होत चाललं आहे. सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्बनडायऑक्साईड शोषून घेणारी सर्वाधिक झाडं लावणं गरजेचं आहे.

 

या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे श्रमशक्ती शैक्षणिक संस्थेच्या वतीनं केवळ दोन महिन्यात एक लाख कडूलिंबांच्या झाडांची लागवड करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांकडून 15 रुपये किलो प्रमाणे कडूलिंब बियांची खरीदी करण्यात आली.

 

कडूनिंबाच्या झाडात 75 टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेणाची क्षमता असते. कडूलिंबाच्या लिंबोल्यांपासून निम लेसिक युरिया बनवून उपयुक्त निंबोळी पेंड तयार केली जाते. यासाठी श्रमशक्ती शैक्षणिक संस्थेनं हा उपक्रम राबवला असल्याचं सतिश घाडगे यांनी संगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version